Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Seminar & Program
AurNima Seminar

Nagpur  September 27,2019

  

खरंतर निमा ने एवढा मोठा फक्त आयुर्वेदासाठी सेमिनार घेतला हीच बाब मुळात कौतुकाची व कुतूहलाची होती.
आदरणीय डॉ मोहन येंडे सर यांच्या पाठपुराव्याने व नागपूर निमा चे अध्यक्ष श्री डॉ अग्रवाल सर यांच्या संकल्पनेतून #आयुर्निमा हा एक दिवसीय सेमिनार फक्त आयुर्वेद डोळ्यासमोर ठेऊन पार पडला.
सर्वच टीम निमा फार आत्मीयतेने कार्यमग्न होती.
अत्यंत उत्कृष्ट नियोजन होते.
सेमिनार हॉल अत्यंत सुंदर होता.
हाऊसफुल्ल रजिस्ट्रेशन मुळे 700 पेक्षा जास्त लोकांनी भरलेले सभागृह जणू नागपूर निमाच्या कार्याची, विश्वासाची व प्रामाणिक पणाची पावतीच देत होते.
व्याख्यान देताना उत्साह द्विगुणित झाला होता.
माझ्या पायाला फ्रॅक्चर नंतर मीही या महिन्यात पहिल्यांदाच 2 तास उभा राहून व्याख्यान दिले.
ती तेथिल उपस्थितांच्या श्रोत्यांच्या ऊर्जेचा परिणाम होता असे मला वाटले.
कार्यक्रमाचे उदघाटन  CCIM चे अध्यक्ष वैद्य देवपूजारी सर यांनी केले.
वैद्यांचे वैद्यत्व व स्वाभिमान यावर फार उत्तम व प्रेरक, मार्गदर्शक उद्बोधन केले.
शिवाय आमची भेट झाल्यावर आवर्जून पुन्हा बोलावून केशायुर्वेद चे कौतुक केले व जळगाव केशायुर्वेद च्या वैद्य भूषण देव यांची भेट झाल्याचे व कार्य पाहिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
आदरणीय सुविनय दामले सर, वैद्य अनिल बनसोडे सर या सर्वांचीच व्याख्याने फार सुंदर झाली.
निमा सारख्या मोठ्या संघटनांनी असे आयुर्वेदाचे कार्यक्रम घेतल्यास नक्कीच सर्वांनाच फायदा होईल.
कारण निमाचे संघटन व कार्य कारिणी पद्धत खरच उत्तम असते.
यापूर्वी सोलापूर निमा मध्ये माझं व्याख्यान झालं होतं, पूर्ण दिवस एकट्याचच होतं, तेथील अनुभव ही फार सुंदर होता.
असेच कार्य निमा कडून सतत होत राहो हीच प्रार्थना व त्यांना भावी कार्यासाठी अनेक शुभेच्छा।
जय आयुर्वेद.
वैद्य हरिश पाटणकर,
केशायुर्वेद, पुणे.