Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Other 
नेत्रतर्पण उपचार शिबिराचा २०५ जणांना लाभ

Pune  October 07,2019

  

पुणे : ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण उपचार व नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात एकूण २०५ जणांनी नेत्रतर्पण उपचार घेतले. ३५ डॉक्टरांच्या गटाने यामध्ये सहभाग घेतला. 

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, लायन्स क्लबचे श्रीकांत बाहेती, राजेश सोनी, नवनाथ धनावडे, जयप्रकाश सोनी, जितेंद्र मेहता, हिरालाल छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही नेत्रतर्पण उपचार करून घेतले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य स्नेहल पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाले. शेठ ताराचंद रुग्णालयाजवळील वाहतूक पोलीस आणि रास्ता पेठ पोलीस स्थानकातील पोलीस यांनीही या याचा लाभ घेतला.

‘नेत्रतर्पण उपचारांमुळे डोळ्यांची जळजळ कमी होते; तसेच चष्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे सतत संगणकावर काम करणारे, उन्हात आणि धुळीत प्रवास करणारे यासह सर्वच नागरिकांनी नेत्रतर्पण उपचार घेतले पाहिजेत. डोळ्यांना ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करण्याचे काम नेत्रतर्पण करते. या उपचारासाठी २०-२५ मिनिटांचा वेळ लागतो,’ असे डॉ. हरिश पाटणकर व स्नेहल पाटणकर यांनी सांगितले.