आम्ही वैद्य आयुर्वेद शास्त्राचे पाईक असतो त्यामुळे आपण शास्त्राचे काहीतरी देणे लागतो ही भावना सतत माझ्या मनात असते. त्यामुळे आयुर्वेदातील सिद्धांताचा वेगवेगळ्या प्रकारे कल्पक रित्या वापर करून नवनवीन संशोधन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. केसांच्या तेलावरील माझे संशोधन वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेमध्ये निवडण्यात आला.
तसेच पारा या धातूवर वर ही माझे बरेच प्रयोग सुरू असतात. सध्या मी सात वेगवेगळ्या पद्धतीने पारा बद्ध करू शकतो. भविष्यात या संशोधनाचा मानवजातीला काय फायदा होईल हे शोधून काढण्याचे माझे ध्येय असेल.
|