Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    प्राचीन गुरुकुल

    Posted On June 28,2019

      
    प्राचीन काळी उत्तम रित्या गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण घेतले जायचे. गुरुकुल ही ज्ञान घेण्याची एक श्रेष्ठ पद्धत होती. ही शिक्षण पद्धती पुनरुज्जीवित करण्यासाठी वैद्य हरीश पाटणकर सरांनी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचीन संहिता गुरुकुल सुरू केले. याच गुरुकुलमध्ये मी घडलो आणि वर्षातून दोन वेळा होणारे हे गुरुकुल आता माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनले आहे. गुरुकुल पुष्प 4मध्ये मला ज्ञान संकुल विद्यार्थी संघातर्फे दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कारही प्राप्त झाला.